आजच्या तणावपूर्ण जीवनात शाश्वत आनंदाचा शोध घेऊया
Oct 4 - Oct 12, 2025
संक्षिप्त परिचय
-सद्गुरू प.पू. डॉ श्रीकृष्ण द. देशमुख उपाख्य प.पू. काका यांचे कृपांकित शिष्य
- तरुणपणी वयाच्या १८ व्या वर्षी सद्गुरुंचा अनुग्रह व त्यांच्या कृपेने दीर्घकाळ पारमार्थिक अभ्यास आणि साधना
- सद्गुरुंच्या कृपाशीर्वादाने व आज्ञेने स्वतः सद्गुरुपदास प्राप्त झालेले, आणि त्यांच्या पारमार्थिक कार्याची अखंड परंपरा श्रद्धेने व समर्पणभावाने पुढे नेत असलेले
- श्रीगुरुपौणिमा २०२५ - सद्गुरूंनी परंपरेचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलेले
- पारमार्थिक जागृतीच्या कार्याला वाहिलेल्या ‘वेदांत भास्कर’ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष
- लौकिक शिक्षण - BE Computer Science; MBA
- गेले २८ वर्षे नोकरीनिमित्त कॅलिफोर्निया, अमेरिका येथे वास्तव्य
- यशस्वी व्यावसायिक कारकीर्द; आंतरराष्ट्रीय कंपनीत Vice President पदावर कार्यरत
- वयाच्या ५०व्या वर्षी सेवानिवृत्ती घेऊन जीवन सद्गुरू कार्याला समर्पित
- गेल्या २३ वर्षांपेक्षा जास्त काळ परमार्थाच्या प्रसाराचे सद्गुरुसेवेचे खडतर व्रत
- २००२ पासून, प.पू. काकांच्या दीर्घ प्रवचनमालांचे तर मागील १२ वर्षात नियमितपणे प.पू. मंदाताई, प.पू. गोविंददेव गिरी महाराज, महामंडलेश्वर प.पू. अवधेशानंद गिरी महाराज इत्यादी सत्पुरुषांच्या निवासी अध्यात्मिक शिबिरांचे अमेरिकेत आयोजन
- प्रस्थानत्रयी (उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भगवदगीता) व संतसाहित्याची साधनाभिमुख शिकवणीचा सर्वांना लाभ व्हावा म्हणून वेदांत भास्कर या संस्थेमार्फत विविध प्रकारचे कार्य
- विविध प्रांतांतील संस्थांकडून मिळणाऱ्या आमंत्रणानुसार अमेरिकेत प्रवचन दौरे करत, त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांतून वेदांत व संत साहित्याचा गूढार्थ साधकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य अत्यंत प्रभावीपणे केले आहे.
- विविध विषयांवर दीर्घ प्रवचनमाला सुरु आहेत - आनंदाचे तत्वज्ञान, विवेक चुडामणि, अथर्वशीर्ष, श्रीज्ञानेश्वरी, श्रीनारद भक्तिसूत्रे इत्यादी
- विविध व्यासपीठांवर आजतागायत झालेली पू. श्री मंगेश फडके यांची ३०० पेक्षा अधिक प्रवचने ‘वस्तुसिद्धी’ या YouTube चॅनेलवर सर्व साधकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
- पारमार्थिक कार्याबरोबरच समाजाचे ऋण फेडणे ही आपल्या कर्तव्यभावनेची जाणीव ठेवत, गेल्या १२ वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्थांना दरवर्षी लाखो रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
- स्वतःच्या आध्यात्मिक साधनेबरोबरच आपल्या पुढच्या पिढीचा संस्कारित विकास व्हावा या उद्देशाने, गेली १४ वर्षे विनाशुल्क बालसंस्कार वर्ग सातत्याने चालवला जात असून, लहानग्यांच्या मनामनात संस्कारांचे बीज रोवण्याचे कार्य शांतपणे सुरू आहे.
संक्षिप्त परिचय
- सौ. सोनाली फडके मुळच्या अमरावतीच्या असून गेल्या २८ वर्षांपासून बे एरिया, कॅलिफोर्निया येथील रहिवासी आहेत.
- शैक्षणिक पार्श्वभूमी - Architectural Engineering BArch from VRCE, Nagpur + MArch from CEPT Ahmedabad
- कीर्तन हा त्यांच्या दृष्टीने व्यवसाय नव्हे, तर सगुण भगवंताची भक्ती आणि साधनेचा एक पवित्र मार्ग आहे.
- त्यांच्या घराण्याला कीर्तनाची एक सशक्त आणि अखंड परंपरा लाभली आहे. आजोबा, वडील, काका आणि आताच्या पिढीत भाऊ — असे सर्वच अत्यंत प्रतिभावंत आणि अभ्यासू कीर्तनकार आहेत. ही परंपरा त्यांनी श्रद्धेने पुढे चालवली आहे.
- अमरावतीमध्ये त्यांच्या माहेरी १५० वर्षांची परंपरा लाभलेले प्रभू रामचंद्राचे मंदिर असून, तिथे वर्षभर विविध आध्यात्मिक कार्यक्रम सुरू असतात. त्यातील रामनवमीचा वार्षिक महोत्सव विशेषतः भक्तिभावाने परिपूर्ण आणि शेकडो भाविकांना एकत्र आणणारा असतो.
- सद्गुरू प. पू. डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख ह्यांच्या कृपाछत्राखाली त्यांचा वेदांताचा अभ्यास सुरु असून, त्या कृपेच्या प्रभावामुळे त्यांच्या कीर्तनातील निरूपणही अत्यंत वेदांतप्रचुर आणि तत्त्वज्ञानाने समृद्ध असतं.
- भारतात आणि अमेरिकेत, विविध भक्तिसोहळ्यांच्या निमित्ताने त्यांनी भावपूर्ण कीर्तनसेवा केली असून, नारदीय परंपरेचा तात्त्विक गाभा आणि वारकरी संप्रदायाचा रसाळ भक्तिभाव यांचा सुरेख संगम त्यांच्या कीर्तनात अनुभवायला मिळतो.
- आजच्या बदलत्या सामाजिक जीवनात, नव्या जीवनशैलीच्या गतीत आणि मनोरंजनाच्या असंख्य पर्यायांमध्ये कीर्तन ही आपली प्राचीन अध्यात्मिक परंपरा हरवू नये, यासाठी आधुनिक कीर्तनकारांनी सातत्याने विचार करायला हवा, असं त्यांचं मत आहे. कीर्तनाचा खरा उद्देश — सगुण भगवंताची आराधना आणि निर्गुण तत्त्वज्ञानाचं स्पष्ट, समजणाऱ्या भाषेत निरूपण — याची पूर्ती ही काळानुरूप सादरीकरणातून व्हायला हवी, असं सौ सोनालीताई स्पष्टपणे सांगतात.